जीएसटी - लागू की लादू

राज्य सरकारांना केंद्राकडून जो महसूल दिला जातो, त्यात मागील वर्षी ३२हून४२ अशी घसघशीत वाढ झाली होती. मात्र ही वाढ आणि यामागचे अर्थकारण आता सर्व राज्यांच्या पुढ्यातील ताटात वाढून यायला लागलं आहे. वस्तू आणि सेवा करप्रणाली ही अत्यंत किचकट अशी प्रणाली राहिली आहे. आतापर्यंत तिचा अंमल करण्यासाठी तिच्यात अंमळ सहा सातवेळेस बदल करावे लागले आहेत. यामुळे तिच्यात असणारी गुंतागुंत कमी होण्याऐवजी वाढीसच लागली असल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे.

केंद्र सरकार नियमितपणे राज्य सरकारच्या तिजोरीत महसूल देणं करते. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची झळ सामान्य माणसांच्या खिशास लागली त्याप्रमाणे राज्य महसूलालाही ती सोसावी लागली. हा कर लागू झाल्यामुळे राज्याचे स्वतःचे असे कर उत्पन्न घटले. त्यामुळे करांवर आधारित राज्याचे मनसुबेच एकप्रकारे उधळून लावण्यात आले.त्यामुळे आता दर महिन्याला शेवटी जसा सामान्य माणसाच्या खिशात खुळखुळा असतो तसाच आता तो राज्याच्या तिजोरीतही होणार आहे. गेल्या वर्षांपासून तिजोरीत महसूल वाटा हा एक तारखेस देण्यात येत होता. मात्र वस्तू सेवा कर प्रणालीत आता होणाऱ्या नव्या रचनेने राज्यांना त्यांचा करहिस्सा १५ तारखेला होणार आहे. कल्पना करा की तुमचा पगार तुम्हाला १५ तारखेला जमा झाला तर कशी परिस्थिती निर्माण होईल, आता ही परिस्थिती राज्यांवर लादली जाणार आहे.

या निर्णयामुळे देशातील दोन राज्यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही ती दोन राज्ये. आधीच राज्यातील सेवा कर्मचारी, राज्यासाठीच्या पायाभूत सुविधा या पुरवण्यात वस्तू आणि सेवा कर यामुळे मोठ्या अडचणींचा सामना राज्यांना करावा लागत आहे. विक्री कर, अबकारी कर, मूल्यवर्धित कर, आदी माध्यमांतून राज्यांची गंगाजळीत बऱ्यापैकी ठेव खळाळती असायची, त्यामुळे राज्यसेवा कर्मचारी दोन वेळचे पोटभर जेवण करू शकत होते, तर काही प्रमाणात तेव्हाही बोंब असली तरी पायाभूत सुविधा राज्यांना पुरवता येत होत्या. मात्र वस्तू आणि सेवा कराने राज्यांच्या पोटावर पाय दिला असेच म्हणता येईल. आता त्यांना केंद्राच्या आशेवर १५ दिवस वाट काढत राहणे आले.

राज्यांचे एकूण खर्च भागवताना राज्य दर महिन्याच्या सुरुवातीस आपला वाटा घेऊन सुस्थितीत कारभार चालवू शकत होती. मात्र पुढील वर्षापासून फक्त १५ तारखेला पैसे मिळणार आहेत असे नाही तर चालू सरकारच्या कार्यकाळाच्या अखेरच्या वर्षात राज्यांना तिमाही करहिस्सा प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण पडणार आहे. अर्थात ही गोम केंद्राला करावी लागली यामागेही अर्थशास्त्रीय कारण आहे. हट्टाने एक नवीन जोड बनवून घ्यावा आणि मग आपल्यालाच तो घासत घासत वापरायला लागावा अशी बिकट परिस्थिती केंद्राचीच झाली आहे. राज्यांकडून येणारा कर महसूल घटला, आणि त्यातूनही १तारखेस हिस्सा द्यावा लागतोय, म्हणज उधळण माणक्यांची करायची तर हातात चाणके यायला लागलेत अशी गंभीर नुकसानकारक परिस्थितीला केंद्रही तोंड देते आहे.

त्यामुळे मागील वर्षी पंतप्रधानांनी राज्यांना महसूल वाढवून दिला, त्याचा तेव्हा आनंदोस्तव साजरा करण्यात आला, पण आता मात्र त्या निर्णयाचा गांभीर्याने पुनर्विचार करण्याची सगळ्यांवर वेळ आलेली आहे. याचसोबत पेट्रोल डिझेल यांचाही वस्तू आणि सेवा करात समावेश करण्यात आला तर राज्यातील तिजोरीची ठणठण ही सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर ऐकण्यात मिळू शकते. राज्यातील पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्य सेवा कर्मचाऱ्यांचे पगार या पातळ्यांवर सध्याही महाराष्ट्र राज्य कमी पडत आहे. अन वस्तू आणि सेवा कर प्रणालीत अजूनही व्यूहात्मक बदल जो सध्या केंद्राविचाराधीन आहे तो बहुदा आपल्या महाराष्ट्राला बिनबोभाट मान्य होईल असे दिसते. मुळात महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री कोण आहेत याचीही सामान्यजणांना फारशी कल्पना राहिलेली नाही. महसुलची चालू आकडेवारीही जनतेच्या पुढ्यात ठेवली असल्याचेही दिसून आले नाही, तेव्हा राज्य करांना कड्याबंद करणाऱ्या वस्तू सेवा कराच्या नव्या बदलावर तेलंगणा आणि पश्चिम बंगालनुसार महाराष्ट्र प्रश्न, बंड उपस्थित करणार का, की होणाऱ्या उपासमारीला स्वीकारून राज्याच्या जनतेलाही तेच भोगायला लावणार हे औत्सुक्य येणारा काळच मिटवू शकणार आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी जुलैत लागू झाला असला तरी तो आता लादू जातोय की काय अशीच म्हणायची वेळ आली आहे.

लेख

DR. LIVING DEAD Posts Video to New Song “Terror Vision”

Here it comes, folks! A brand new video of the song “Terror Vision”, taken from DR. LIVING DEAD!’s upcoming studio album “Cosmic Conqueror”, which will be released on October 27th, 2017. 76 weitere Wörter

News

@Jayalalitha

Jayalalitha was one of the most corrupt politicians. No CM would near her in terms of corruption,nepotism (not to her family, but Sasikala’s). An Emergency like situation was in AIDMK when she was at the helm. 164 weitere Wörter

Kdrama Review: Criminal Minds

To tell you the truth it was really hard to criticize this remake because i am so hesitant. I’m a die-hard Lee Joon Gi fan and a Moon Chae Won fan but yeah please keep on reading to know my thoughts. 1.630 weitere Wörter

Korean Drama Review

Miyata Quick Cross Hybrid Bicycle Frameset - 54 Cm

Miyata Quick Cross Hybrid Bicycle Frameset – 54 Cm
Up For Sale: Miyata Quick Cross 54 Cm Hybrid Frame Here Are The Frame Specs: Color: Dark Green Frame Construction/material: Bonded/Lugged Alloy Fork: N/a Headset: 1” Seat Tube /C-T/: 54 Cm Seat Tube ID: 25.0 Mm Top Tube /C-C/: 55 Cm Rear Spacing: 130 Mm Wheel Sizing: 700c Hybrid Condition Used – Good Condition Auction Includes One Frame, NO Fork #FRM004 Payments Must Be Received Within Seven Days From End Of Auction DETAILS-PLEASE READ BEFORE BIDDING To The USA Lower 48, Everywhere Else Is Calculated. 146 weitere Wörter

Collectibles